शब्दफुले

मज बालपणी खेळवुनी
लाविला मज तुम्ही लळा
बाबा, मज रमवीता तुम्ही ,
ना केला कधी कंटाळा ..


कधी घोडा घोडा केले
ओझ्याचे गाढव केले
मी किती तुम्हाला छळले
परि मन तुमचे विरघळले ..

मी तळहाताचा फोड
पुरविले सर्व मम लाड
ठेवून मनी ना स्वार्थ
घालवला ना क्षण व्यर्थ ..

कालांतरी झालो मोठा
सन्माना ना मज तोटा
हा वरदहस्त रहावा
तुम्ही आशिष मजला द्यावा ..

गुणगान हे नुसते नाही
हा आदर आपुलकी हो
पाठीशी शतवर्षे अजुनी
सहवास हा तुमचा लाभो ..

आजच्या ह्या विशेषदिनी
वंदन मी तुम्हास करुनी
तुम्हाला शब्दफुले ही
मी चरणी अर्पण करतो .. 

 .

२ टिप्पण्या: