गुंजन

रुपेरी रुपेरी वाळूतली
गुलाबी मिठी तुझी माझी 

फेसाळत्या शुभ्र लाटा
एकटक आपली नजरबंदी 


पाणी निळेशार दूरवर
बोटात बोटे गुंफलेली 


लालबुंद रविराजाची साक्ष
  धुंद आपले मिठीतले श्वास 


सोनेरी क्षितीजाची कड
भावनांची घुसमटती धडपड 


चमचमती किरणे पिवळी
नयनांत मिठीची नव्हाळी 


दाट दाट झाडी हिरवीगार
पापण्यांची हळवी थरथर 


किलबिलती वरून पाखरे
ओठांची अस्फुट कुजबुज 


सांज रहावी अशी चिरंतन
  आणि आपले मिठीत गुंजन ..

..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा