बायकोपेक्षा मेहुणी -ऑफिसातून घरी येऊन जरा हाश्शहुश्श करीपर्यंत ,
बायकोने त्या मलिंगासारखा प्रश्नाचा एक तिरकस चेंडू
माझ्या दिशेने फेकलाच -

"अहो ! आज तुम्ही ऑफिसातून येताना,
छानसा गजरा घेऊन येणार होता ना माझ्यासाठी ? 
मग काय झालं ! "

मी चाचरत उत्तरलो -
" अग, मी तुला सकाळी म्हणालो होतो खरच ,
आज 'जगातल्या सगळ्यात सुंदर तरुणी'साठी -
मी मस्तपैकी एक गजरा आणणार आहे म्हणून.....
पण, 
ऑफिसातून येताना मी गजरा घेतलाही होता ग ..."

माझे वाक्य उत्साहाने तोडत तिने विचारले -
" अहो द्या ना पट्कन मला तो ! "

मी उत्तर देऊन मोकळा झालो -
" तुझी धाकटी बहीण रस्त्यात भेटली येताना...... ! "
.

६ टिप्पण्या:

  1. मलिंगासारखा प्रश्नाचा एक तिरकस चेंडू
    माझ्या दिशेने फेकलाच - क्या बात है !!
    http://abhivyakti-india.blogspot.in/

    उत्तर द्याहटवा
  2. Vahinnina chidnyachi pn soy nahi thevlit....

    उत्तर द्याहटवा