उपदेशाचे डोस कशाला उगा पाजतो - गझल

अनलज्वाला वृत्त -
(८+८+८ मात्रा)
....................................................
उपदेशाचे डोस कशाला उगा पाजतो
जागोजागी घडे पालथे जरी पाहतो..

घेत राहतो रोजच फाशी कुणीतरी पण
कुठला नेता पोट उपाशी धरून बसतो..

एक वेगळी तुजवर कविता कशाला करू
नजरेसमोर कायम प्रतिमा तुझी ठेवतो..

गावामधल्या सुधारणेची रोज वल्गना
पण त्यासाठी शहर कुणीही सोडत नसतो..

होते माती जास्ती धरता हाव जर मनी
माहित असले तरी न संधी कोण सोडतो.‌.
.

खरोखर जगी का खुळे वाढलेले .. (गझल)

खरोखर जगी का खुळे वाढलेले शहाणे कमी का दिसू लागलेले .. कशाला उगाळू जुने दु:ख माझे सुखी जीव सारे मला वाटलेले .. भरारी नभी मी कशी आज घेऊ कुणी पंख माझे कधी छाटलेले .. किती छान वाटे शवाला स्मशानी स्तुती सोहळे हे असे रंगलेले .. न आले कधी ते मला पाहण्याला कळालेच त्यांना खिसे फाटलेले .. .

स्वागतास तो छान मुखवटा.. गझल

लवंगलता वृत्त
८+८+८+४
अलामत.. ऊ
रदीफ.. जातो
काळिमा.. करून, होऊन

स्वागतास तो छान मुखवटा धारण करून जातो
निरोप देता आरशापुढे खूष होऊन जातो

खिन्न मनाने तळहाती तो बघतो अंधुक रेषा 
होत निश्चयी कुदळ फावडे हाती धरून जातो

युद्ध संपता हरवत बसतो नादात कुठे योद्धा
अगणित जखमा न्याहाळत तो मनी हरखून जातो

घाव सोसतो जीवनभर तो दुसऱ्यांसाठी मोठे
कावळ्यासही आधार कसा पुतळा बनून जातो

आवडले ना भिरभिरणारे पाखरू कधी होणे
पुस्तकातला किडा एक मी त्यातच रमून जातो..
.