राधेचा कन्हैया -इकडे तिकडे शोधुन राधा बसली हिरमुसुनी 
झाडाला टेकताच अवचित सूर आले वरुनी ..

फांदीवरती डोलत होता कन्हैया मुरली धरुनी 
इथेच होता दिसला नव्हता हिरव्या पानामधुनी ..

पाहुनिया वर खुषीत आली राधा मनोमनी 
हरखुन गेली कितीक धडधड वाढे हृदयातुनी ..

लटका रुसवाफुगवा वाटे तिला दावुया मनी 
पट्कन फांदीवरून उतरे कन्हैया ते जाणुनी ..

मुरली लावी अधरास तिच्या एक हात धरुनी
जवळीकीने गेला रुसवा झणि राधेचा विरुनी ..

पुष्प हातचे मुकुटी ठेवुन भाळासी चुंबुनी 
उभी होतसे अधोवदन ती हात हाति गुंफुनी ..

लिपटे जैसी वृक्षास लता, एकरूप होऊनी 
गाली लाली क्षणात येई कन्हैयास बिलगुनी ..
.

लग्नाची बेडीनोकरी करणारी छान छोकरी 
बायको म्हणून घरी आली 

तेव्हापासून माझ्या नशिबी  
रोज घरची  नोकरी आली 

सकाळ होताच चहापासून 
बायको-सेवा सुरू झाली 

नाष्टा जेवण तयार करता 
तिच्या डब्याची वेळ झाली 

टाटा करून घरात बसता 
धुणी भांडी समोर नाचली

कामावरून ती घरी येता 
तिच्या चहाची वेळ झाली 

भांडी घासून बोटं सुजली 
धुणी पिळून हाडं झिजली 

कामवालीचा विषय काढता 
काटकसर उपदेशात आली 

पायावरती धोंडा पडला 
का लग्नाची बुद्धी झाली 

ह्या बेडीतून सुटका नाही
महामाया ही नशिबी आली ! 


.

आमची अशीही एक चैन -काल संध्याकाळी ,

बायकोबरोबर फिरायला जाऊन आलो.


दावणगिरी स्पंज डोसा खाल्ला.

शेवपुरी दहीपुरी खाल्ली. 

कच्छी दाबेली खाल्ली. 

भेळ खाल्ली.

आईस्क्रीम खाल्ले !


आणखी चैन करावी..

 म्हणून,

मग आम्ही दोघे, 

लांबच्या मंडईत जाऊन..


तिथे -

सगळीकडे डोळेभरून ,

 "कांदे" बघून घरी आलो !
.

अस्से सौंदर्य सुरेख बाई
तू विचारलेस जोरात  मला -
' काय केलेस तू , माझ्यासाठी  ? ' मीच विचारतो तुला -

' काय सहन नाही केले, ग तुझ्यासाठी ? '... हे माझे दोन्ही ओठ -

आजवर एकमेकांना 
भेटले नाहीत कधी. . .! एकमेकाशी 

अक्षरही न बोलता - 
ते "आ" वासून ,अजूनही ,

एकमेकापासून 

दूरच आहेत ...- अगदी तुला प्रथम पाहिले,

त्या क्षणापासून . . .तारीफ करण्यासाठी -

तुझ्या सौंदर्याची !.

कथा आजच्या कांद्याची -


बायकोला कांदे नवमीच्या दिवशी, 
अगदी बजावून ठेवले होते...

आजचा मेनू असा राहू दे - 

कांद्याची कोशिंबीर 
कांद्याचे थालीपीठ 
कांद्याची चटणी 
स्यालडमधे कांदा 
कांदा भजी 
कांद्याचे लोणचे 
ओनिअन उत्तप्पा 
कांद्याची भरडभाजी !

वा ! वा !
कांदेनवमीला ते खाल्लेले पदार्थ आठवूनही ,
कालपर्यंत तोंडाला पाणी सुटत होते ...

आज -
कांदे नुसते खरेदी करायचे म्हटले तरी ,
तोंडाला कोरड पडली आणि ,
डोळ्यातून टच्चकन् पाणी टपटप गळायला लागले की हो !

कांद्याने भलताच केलाय वांधा !
.

अशी वाहने येती - (विडंबन)(चाल - अशी पाखरे येती - )


अशी वाहने येती, आणिक ढुशी देऊनी जाती 

दोन दिशांनी धावत थांबत, दोष दुजाला देती ...    

खांब तो मला कधि ना दिसला, ताठा कोठे अता राहिला  

जरा खालुनी, जाय उखडुनी, तारा वरच्या झुकती ...    

पुढून येता पोलिस दिसले, मी स्कूटरवर मला तोलले   

नव्हते लायसन्स, घरीच ते तर, कुंठित झाली कुमती ...

   

हात एक तो पुढेच सरला-  काठीवर खात्रीने फिरला- 
देवघेवीतील सवयी अजुनी, कुठून मज त्या कळती ...    

पुढे तयांच्या खाण्यासाठी, मीच हात ते धरले हाती    

त्या घडल्या तोडीची आता, दूर पसरली ख्याती ...

.

मनकवडी मी मनकवडीका कुणास ठाऊक -
मी स्वत:शीच गुणगुणत बसलो होतो .
तेच प्रसिद्ध गाणे -

' ए मेरी जोहराजबी, 
तुझको मालूम नही -
तू अभीतक है हसी
 और मैं जवां ......."

पदराला हात पुसत,
 बायको खुर्चीजवळ येऊन म्हणाली -
" काय मिष्टर ? 
आज एकदम खुषीत दिसताय ! "

काय उत्तर द्यावे,
तेही मला ऐनवेळी सुचेना ! 

मी गप्प बसलो,

ती त्यामुळे आणखी जोरात म्हणाली -
" चालू द्या तुमचे ते फेस्बुक..
 आणि प्रोफाईल बघणे निवांत ..
मला आणखी कामं आहेत बरीच घरात ! "

.... खऱ्याच मनकवड्या असतात का हो स्त्रिया ?
.

ऐकावे जनातले आणि खावे घरातलेकाल दुपारी मी बायकोला सांगून टाकले - "अग ए, ऐकलस का !
आज रात्री माझ्या नावचा स्वैपाक करू नकोस हं ! " 

बायकोने विचारले - " का हो ! काय विशेष ? "

मी उत्तरलो -" आपलं सहजच . तो राज गब्बर म्हणाला नाही का ग परवा-
' बारा रुपयात जेवण मिळते', म्हणे त्या मुंबईत ! 
चाखून येतो जरा वेगळी टेस्ट ! " 

बायकोने विचारले -
 " अहो , पण एकदम असे बारा रुपये जेवणासाठी, बाहेर चैनीसाठी उडवायचे म्हणजे, 
आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना झेपणार का ? "

मी म्हणालो - " अग, काटकसर आपल्या पाचवीलाच पुजलेली आहे ना ?
आणि हे बघ, रात्री तुझा स्वैपाकही करूच नकोस ! 
तुझ्यासाठीही मी बारा रुपयाच्या जेवणाचे पार्सल आणतो. 
तुझीही चैन होऊ दे ना एखादा दिवस ! "

बायकोचा प्रफुल्लित चेहरा बघून-
 माझा आनंद दिवाणखान्यात मावेना हो ! 

होती नव्हती तेव्हढी शिल्लक घेऊन मी तडक मुंबईला रात्री पोहोचलो. 

....पत्र्याच्या टपरीपासून, 
ते थेट ताज हॉटेलपर्यंत सगळीकडे चौकशी करून दमलो !
माझ्यापेक्षा भारी कपडे घातलेल्या, त्या ताजच्या द्वारपालाला मी भीतभीतच विचारले देखील शेवटी -
" साहेब, इथे मुंबईत बारा रुपयात जेवण कुठे मिळते हो ? "

अंगावर चढलेल्या झुरळासारखे, माझे वाक्य ऐकून त्याने झटकले..
आणि पुन्हा तो आपल्या ड्युटीवर हजर होण्यासाठी-
 'नमस्ते साब' म्हणत, दुसऱ्या पॉश कष्टमरकडे वळला !

खूप ट्याक्सीपीट करून,
 माझ्या पोटात शेवटी सगळे पशुपक्षीप्राणी ओरडायला लागले !

शेवटी मनाला म्हटलं - " आपले घर ते घरच ! इथली जिवाला नुसती घरघरच !
गरीबाची बरी भाजीभाकरी, बारा रुपयांची चैन नको ! "

तडक घरी आलो ! बायको तर माझ्यापेक्षा समजूतदार !

रात्री बारा वाजता, 
आम्ही घरच्या मस्त पिठलेभाकरीवर यथेच्छ ताव मारला !

आम्ही दोघांनी आता ठरवले आहे - 
" ऐकावे जनातले आणि खावे घरातले ! " 
.

श्रावण आलापाऊस आला आणि गेला 
आनंद मागे ठेवुनी  गेला ..

तृप्त जाहली ही धरती 
हर्षित आकाश डोईवरती ..

डोलती पाती गवताची 
मैत्री सांगत वाऱ्याची ..

तजेला कळीकळीस येई 
सुवास फुलाफुलात न्हाई ..

पक्षी होत गगनविहारी 
किलबिलाट पिलात भारी ..

द्विपाद आणि चतुष्पाद 
प्राण्यांचा आनंदी घोषनाद ..

सरोवरात क्मळदले 
भृंगास अंतरंग खुले ..

प्रसन्न होई वातावरण 
धरेस हिरवाईचे आवरण ..

श्रावण भासे जिकडे तिकडे 
आनंदलहरी सगळीकडे ! 

.

पळसाला पाने तीनच


काल मैत्रीदिन संपला.
आजपासून आणखी ३६४ दिवस-
ह्या "दीना"चे रोजचे रहाटगाडगे सुरू .......

"हे करा -" 
"ते करा -"
" हे का केले नाही -" 
"तेच कसे करायचे राहिले -"

ऑफिसातही तेच 
आणि -
घरीही तेच !

तिकडे "बॉसगिरी "
आणि -
इकडे "बायकोगिरी" !

एक ना दोन ....
काम करूनही वर दादागिरी त्यांचीच !

कंटाळा आला ह्या सहनशीलतेचा !

कधी कधी वाटत,
जीव द्यावा कुठेतरी जाऊन .

पण तेवढे धाडस कुठले ?

तिथेही येऊन पुन्हा वर दम भरायला तयार -
" जीव द्यायला हीच जागा आणि हीच वेळ बरी सापडली हो तुम्हाला ! "

काही झाले तरी शेवटी ...
एक "नवरा" ना !

भोगा आता नवरेपणाचे भोग ह्याजन्मीचे !

आपले दु:ख हलके करावे ह्या सद्हेतूने ,
मघाशी हळूच,
 एका विवाहित मित्राकडे हे सगळे माझे दु:ख सांगायला गेलो तर ...

तोच माझ्या गळ्यात पडून रडत म्हणाला -
" मी हेच सांगायला तुझ्याकडे येणार होतो रे आत्ता ! "

खड्डा गीतत्याला मिळाली नोकरी महापालिकेत 
खड्डयाचा हिशोब तपासणे नशीबात !

खड्ड्यात छोकरी पडताना त्याने सावरले 
केवळ खड्ड्यामुळे दोघांचे लग्नही जमले !

लग्नामुळे रोज रोज बाहेर फिरणे झाले
खड्ड्यातल्या चिखलाने नवे ड्रेस आले !

होई दुचाकीवर दोघांची रोज प्रभातफेरी 
आदळले एका खड्ड्यात- हाड मोडून घरी !

तिला स्वैपाक जमेना- त्याला उपास 
रोज रोज त्याच्या पोटात खड्डा झकास !

झाले निमित्त भांडणाला- रोज जेवणाचे 
ती ओरडली - जा खड्ड्यात एकदाचे !

माणसाचा प्रवास असा ध्यानात ठेवा, 
खड्ड्यामुळे खड्ड्यात कधी न व्हावा !

.

उजळणीशाळा तपासणीसाठी 
अधिकारी आले.

पहिलीच्या मास्तरांनी 
प्रत्येक पोराला 
त्यांच्यासमोर 
एक पासून शंभरपर्यंत आकडे 
मोजायला सांगितले.

तपासणी अधिकारी 
एकदम खूष झाले .

मास्तरला त्यांनी विचारले -
"मास्तर, पोरांची उजळणी
 इतकी कशी काय पक्की झाली हो ?"

मास्तरांनी तंबाखूची पिचकारी लांबवर मारत 
उत्तर दिले-

" नगरपालिकेपासून आपल्या ह्या शाळेपर्यंत
रोजची रस्त्यातले खड्डे मोजायची 
प्रत्येकाला सवय झालीय ना ! "

.

हॅपी फ्रेंडशिप डे -


रोजच्या प्रमाणे अकरा वाजता,
 संगणकापुढे बसून मन लावून काम करत होतो.

पाठीमागे अचानक धपधप आवाज आला.
मागे वळून बघतो तो,
 बायको स्वैपाकघरातून माझ्याच दिशेने येताना दिसली. 
एका हातात ते जगप्रसिद्ध लाटणे ,
दुसऱ्या हाताने आपल्या झिंज्या सावरणे चालू होते. 

मी उगाचच सवयीनुसार घामेघूम.
काय झाले नक्की काहीच कळेना.
माझा हात थरथरू लागलेला.

माझी स्थिती बायकोच्या ध्यानात आलेली असावी. 

जवळ येऊन तिने विचारले-
" का हो ! असे एकदम घाबरायला काय झाले तुम्हाला ?
मी कुठे काय म्हणाले का,
आत्ता तुम्हाला काही ? "

कपाळावरचा घाम पुसण्याचा प्रयत्न करत, 
मी उत्तरलो -
" न न नाही , त त त तसे काही नाही . "

तिने हातातले लाटणे खुर्चीवर एका बाजूला अलगद ठेवले. 
डोक्यावरचे अस्ताव्यस्त केस व्यवस्थित करत ती म्हणाली -
" अहो, आज फ्रेंडशिप डे नाही का ?
त्या पोळ्या लाटता लाटता, माझ्या एकदम ध्यानात आलं हो.
परत विसरून जाईन म्हणून आत्ता घाईतच आले.
मिष्टर, ह्यापी फ्रेंड्स डे बरे का ! "

हात्तिच्या !
किती घाबरलो होतो मनातून मी .

मीही धीर एकवटून उत्तरलो -
" थ थ थ्यांक्स म्याडम.
सेम टू  यू ! "

ती आत निघून गेली ..
आणि माझा जीव एकदाचा संगणकात पडला !
.

जनरेशन ग्याप -
बापाने एका टपरीतून बूट खरेदी केले.


घासाघीस पाचवीला पुजलेली असल्याने ती यथासांग केली. 


विक्रेत्याने एक वर्षाची खात्री दिली .घरी आल्यावर मुलाला बूट दाखवले.

मुलगा- "केवढ्याला ?"

तो - " अरे , फक्त अडीचशेला ! " 


त्याच्या उत्तरातला उत्साह वाखाणण्यासारखा होता.
निर्विकार मुद्रेने मुलाने नुसताच हुंकार दिला.दुसऱ्या दिवशी मुलाने बूट खरेदी केले. कोपऱ्यात नीट ठेवले .

तो- "केवढ्याला ? "

मुलगा- "फक्त बावीसशेला .. ब्र्यांडेड आहेत ! "

बाप कौतुकाने वा वा म्हणाला .


चार दिवसानंतर .....


दोघेही बापलेक भिजत घरी आले .

दोघांच्याही बुटांच्या तळाला चिखल भरलेला !

दोघांनीही आपापले बूट नळाखाली स्वच्छ घुतले .

बापाने बूट व्यवस्थित कोपऱ्यात ठेवले .मुलगा बूट आणि त्याचा बाजूला निघालेला तळ...


डोळे विस्फारून पहात होता .बाप काळजीने त्या तिघांकडे आळीपाळीने पहात होता !


.
.

मित्र -


मित्र म्हणजे मित्र असावा 

विश्वासाला पात्र असावा ..खांद्यावरच्या डोक्याला 


थापटणारा मित्र असावा ..
तोंडावर बोलुनिया गोड 


तोंडघशी पाडणारा नसावा .. 
संकटात ना पुकारता 


पाठीशी अपुल्या असावा ..
वेळ पाहुनी कौतुक अथवा


निंदाही करणारा असावा .. 
मदतीवेळी हात आखडून 


पळ काढणारा नसावा ..
शंभर नसले संधीसाधू ,


खास एक तरी मित्र असावा !

.