अस्से सौंदर्य सुरेख बाई




तू विचारलेस जोरात  मला -
' काय केलेस तू , माझ्यासाठी  ? ' 



मीच विचारतो तुला -

' काय सहन नाही केले, ग तुझ्यासाठी ? '



... हे माझे दोन्ही ओठ -

आजवर एकमेकांना 
भेटले नाहीत कधी. . .! 



एकमेकाशी 

अक्षरही न बोलता - 
ते "आ" वासून ,



अजूनही ,

एकमेकापासून 

दूरच आहेत ...



- अगदी तुला प्रथम पाहिले,

त्या क्षणापासून . . .



तारीफ करण्यासाठी -

तुझ्या सौंदर्याची !



.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा