कोठे गेली दुरून बघुनी आशा जागी मनात करुनी .. ओळख झाली इथे फुलांची टकमक बघती खुशाल फुलुनी.. दमलो होतो आपण दोघे इथे फुलांना वेचवेचुनी.. थकतो आहे एकटाच मी आता काटे दूर सारुनी.. भिडले डोळे अचानक जरी साद मिळाली तिचीहि हसुनी .. का बघवेना तिची निराशा गजऱ्याविण ती उदास बसुनी .. शोधत होते सख्यास डोळे उरला हाती रुमाल भिजुनी .. .
ते सर्वजण सहकुटुंब सहपरिवार देवळात जाऊन आले देवळात गर्दी असल्याने बाहेरच्या बाहेर देवळाच्या कळसाच्या दर्शनावर समाधान मानून परत फिरले. पण - इतक्या दूरवर देवळात जाऊन देवाचे दर्शन झाले नाहीच या दु:खापेक्षा -- देवळाच्या पटांगणात ग्रुपसेल्फी घेतल्याचे तेज सर्वांच्याच चेहऱ्यावर अगदी ओसंडून वाहताना दिसत होते ! .
ठेऊन झोपतो मी स्वप्नासही उशाशी तू भेटशील तेव्हां आशा मला जराशी.. दु:खात काळजीला बाजूस सारतो मी स्वप्नातल्या सुखाला कवटाळतो उराशी.. सारा सुखात आहे हा देश आज माझा शहरातले तुपाशी शेतातले उपाशी.. का पीक घोषणांचे उगवे सभेत त्यांच्या आशाळभूत आम्ही होतो किती अधाशी.. उपदेश छान करती ज्ञानी सुजाण येथे कर्तव्यटाळण्याचे ठरवूनिया मनाशी.. .
अ ने ब ला विचारले - " काय रे ब , क ने तिच्या त्या इंग्रजी पोस्टवर काय लिहिल आहे एवढ महत्वाचं ? एकच मिनिटात कित्ती लाईक आलेले दिसतात आणि तू सुद्धा आता दिलास - म्हणून विचारतोय हं !" ब त्यावर उत्तरला - "काय की बुवा, ड पासून ज्ञ पर्यंत सगळ्यांनी दिलेत, म्हणून मीही ठोकलाय रे लाईक ! मला तरी कुठ कळलीय क ची पोष्ट !" .
कौतुक माझे कराल ना तुम्ही "निर्व्यसनी लई भारी तुम्ही -"
- - - कान जरा इकडे करा काय सांगतो ते ऐका जरा - तुम्हाला म्हणून सांगतो मी इतरांना सांगू नकाच तुम्ही आजवर .... आत्तापर्यंत एकाच व्यसनात गुंतलो मी खरं कुणाला सांगायचं नाही खोटं बोलल्याशिवाय रहायचं नाही ! .
दिवसभर रेडिओवर गाणी ऐकून झाली दूरदर्शनवर बातम्यांची बरसात पाहिली दोन तासाचे लग्न आहेर न देता नजरेखालून घातले करमणूक मनोरंजन नावाचे दु:खद प्रकार बघून झाले विनोदी मालिका नावाखाली रटाळ मालिका पाहून झाल्या
शेवटी पाचवीला पुजलेला आळस आणि कंटाळा दोन्ही मदतीला धावून आले
सावधगिरी बाळगत खिशातले एटीएम कार्ड चाचपून बायकोबरोबर फिरायला जाण्याचा निर्णय घेतला
--- बागेजवळ गेल्यावर बायकोला गजरा घेणे प्राप्त होते गजऱ्यानंतर खादगीत तोंड घालणे क्रमप्राप्त होते त्यानंतर आईस्क्रीम ओघाने आलेच
तुलनेने इंजिनिअरिंग वा मेडिकलची एन्ट्रन्स फी कमी - आणि . . . "प्लेग्रुप"ची फी जास्त वाटत असल्याने. . . . मी माझ्या नातवाला डायरेक्ट इंजिनिअरिंग वा मेडिकललाच कसे दाखल करता येईल - याचा विचार करत आहे ! .