आलीया भोगासी -

फोटो चांगला 
दिसत नसला 
तरीही "छान" 
म्हणावच लागत-

लिखाण आवडल 
नसल तरी 
"वा वा, सुंदर"
म्हणावच लागत-

घरी आलेल्या 
पाहुण्याला 
"आनंद झाला" 
म्हणावच लागत-

दु:ख सहणाऱ्याला 
सवयीन "आपण 
सुखात आहोत" 
म्हणावच लागत . . !
.

पडली एकच ठिणगी उरात - [गझल]

मात्रावृत्त- पादाकुलक
मात्रा- ८+८
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

पडली एकच ठिणगी उरात
काच तडकली का जीवनात ..

गेलो मुठीत मिठीतून मी
नकळत शिरली ती का मनात ..

ऊन संपता वाढे थंडी
येतो हाती सखीचा हात ..

उरल्या जखमा प्रेम सोसले
बसलो मिरवत मीच हृदयात ..

धरता हाती साप न डसला
डसली दुरून माणूस जात ..
.

चार चारोळ्या -

खुशाल मजला हसा लोक हो 
एक विदूषक समजून तुम्ही- 
लपवण्यास वेदना लोक हो 
असावे लागते एक काळीजही ..
.

मिरवत आहे तो जगात 
माणूस सुखी म्हणून-
आयुष्य चैनीत आरामात 
घालवी अविवाहित जगून..
.

तरुणाकडून करते अपेक्षा
कुणी तरुणी स्त्रीदाक्षिण्याची -
जागा पण म्हातारीस देण्या 
टाळाटाळच त्या तरुणीची ..
.

चाहूल तुझी लागत नसते 
अस्वस्थ किती असतो मी -
चाहूल तुझी लागत असते 
स्वस्थ तरी का नसतो मी ..
..

" हे अंबे माते जगदंबे ---"

Image result for तुळजाभवानी देवी

वरदहस्त राहो हे माते
नतमस्तक मी होतो ..

कृपा करावी या भक्तावर 
शरण तुला मी नमितो ..

स्मरण तुझे नित मनी चालते 
कर्तव्यात न चुकतो ..

तुला पूजतो तुलाच भजतो 
दर्शनात तव रमतो ..

लाभो तुझाच आशीर्वाद 
चरणी माते झुकतो ..

हृदयी स्थान असो सुविचारा 
प्रार्थनेत ना थकतो ..

हे अंबे माते जगदंबे 
वंदन तुजला करतो ..
.

नकोस जाऊ हिरमुसून तू "लाईक" नाही येत म्हणून -- [हझल]

नकोस जाऊ हिरमुसून तू "लाईक" नाही येत म्हणून 
एक तरी "लाईक" मिळावा पाच "कॉमेंटस" बघ टाकून ..

का घाबरशी "पोक" जरी तू आले त्याचे तुजला शंभर 
शांत रहावे बिनधास्तपणे तूही त्याला "पोस्ट" "ट्यागू"न ..

"पोस्ट" लिहीणे जमे न तुजला हरकत काही नाही आता 
येता जाता खुशाल बघ तू "जीएम" अन "जीएन" लिहून ..

"स्टेटस" अपुले छानच असता कशास करतो मनात चिंता 
"कॉपीपेस्ट" अन "व्हाटसप"चे उदंड ये घे पीक जाणून ..

"मस्त" "वाहवा" "छान" असे जर लिहिले "स्टेटस"वरती कोणी 
ना आवडली "पोस्ट" तयाची "झकास" "वॉव" तू दे ठोकून ..

नसेल फिरकत तुझ्या "वॉल"वर नकोस फिरकू तूही त्याच्या 
आपण जशास तसे व्हायचे अनोळखीसे ओळख असून ..

"लाईक" द्याव "लाईक" घ्याव चालू आहे परंपरा ही   
देवघेव पण अशी चिरंतन जाते सर्वांना आवडून ..

इमारती त्या उंच उंच पण - [गझल]

मात्रावृत्त-
मात्रा- १६+१२
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
इमारती त्या उंच उंच पण नाही कसली हिरवळ नसे तिथे का एक पाखरू नाही मनही निर्मळ .. न थेंब पाणी त्या नळातुनी डोळ्यांवाटे येते किती किती ती चालते सदा पाण्यापायी चळवळ .. चुकार हम्मा वाट शोधते येते गेटामधुनी तिला जलाचा थेंब ना मिळे पाठी मारच केवळ .. निघे कधी तो घोळका पुढे हंडा घागर डोई कुणास नसतो ताळमेळ मग नुसती माजे खळबळ .. विहीर नाही आडही नसे धावाधावच नुसती करा पुकारा शंख ठोकुनी स्त्री पुरुषांची वळवळ .. खुशाल डोंगर फोडणार अन झाडे तोडुन गायब न पावसाच्या स्वागतास ती ना उत्साही दरवळ .. निसर्ग पाही आपल्यावरी घाला मानव घाली जशास तैसे वागणार तो कुठली हृदयी तळमळ .. .

म्हणून ....!

आता नवरात्री देवी येणार 
म्हणून देखावे सुरू होणार 
म्हणून हौसे गवसे नवसे जमणार 
म्हणून गर्दी होणार !

गर्दी होणार 
म्हणून नटून थटून 
देखावे बघत राहणार 
म्हणून खिसेकापू येणार
भुरटे चोर येणार 
मंगळसूत्र पर्स चोर येणार 
म्हणून पोलीस येणार !

लहान बाळे 
पोर पोरी जमणार 
शोधाशोध होणार 
धक्काबुक्की होणार 
म्हणून समाजकंटक येणार 
म्हणून समाजसेवक येणार !

स्वार्थ परमार्थ साधण्यासाठी 
म्हणून सर्वजण येणार 
म्हणून ढोल ताशा वाजणार 
म्हणून गोंगाट होणार !

म्हातारेकोतारे कावणार 
आजारी बेजार होणार 
म्हणून कानात बोटे घालत 
तक्रारी सुरू होणार !

हे दरवर्षीचेच रहाटगाडगे चालणार - - - -

म्हणून मी निवांत
घरातल्या देवीपाशीच -

"सर्वांना सद्बुद्धी दे"
म्हणून साकडे घालत राहणार !
.

तीन चारोळ्या -

'विश्वासघात -'

ऐकतो मी कानात प्राण आणून 
तू कविता वाचत असतांना -
खुशाल तू देतेस घोरत ताणून 
मी कविता वाचत असताना ..
.

'सरीवर सरी -'

एकटाच मी घेऊन छत्री
होतो भटकत कुठेतरी -
आलीस अचानक तू सामोरी
कोसळल्या आठवांच्या सरी . 
.

'गुपित ..'

एक्स-रे माझ्या हृदयाचा 
म्हणे चांगला नाही आला 
कितीजणींचा हृदय-गुंता 
उघडकीला नाही आला  !
.

बहर येता आठवांना - -[गझल]

वृत्त- मनोरमा 
लगावली- गालगागा गालगागा 
मात्रा- १४ 
- - - - - - - - - - - - - - - - - - - 
बहर येता आठवांना
पूर येतो आसवांना..

बेइमानी श्वान नसते 
ज्ञात थोड्या मानवांना..

ऐकता आता कथा "ती" 
झोप येते कासवांना..

राहिला ना राम कोठे 
राज्य अर्पण दानवांना..

ऐकुनीया रोज गीता 
जोर चढतो गाढवांना..
.