म्हणून ....!

आता नवरात्री देवी येणार 
म्हणून देखावे सुरू होणार 
म्हणून हौसे गवसे नवसे जमणार 
म्हणून गर्दी होणार !

गर्दी होणार 
म्हणून नटून थटून 
देखावे बघत राहणार 
म्हणून खिसेकापू येणार
भुरटे चोर येणार 
मंगळसूत्र पर्स चोर येणार 
म्हणून पोलीस येणार !

लहान बाळे 
पोर पोरी जमणार 
शोधाशोध होणार 
धक्काबुक्की होणार 
म्हणून समाजकंटक येणार 
म्हणून समाजसेवक येणार !

स्वार्थ परमार्थ साधण्यासाठी 
म्हणून सर्वजण येणार 
म्हणून ढोल ताशा वाजणार 
म्हणून गोंगाट होणार !

म्हातारेकोतारे कावणार 
आजारी बेजार होणार 
म्हणून कानात बोटे घालत 
तक्रारी सुरू होणार !

हे दरवर्षीचेच रहाटगाडगे चालणार - - - -

म्हणून मी निवांत
घरातल्या देवीपाशीच -

"सर्वांना सद्बुद्धी दे"
म्हणून साकडे घालत राहणार !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा