फेसबुकाध्याय

सकाळी सकाळी प्रसन्न हसावे 
पुढ्यात बसावे संगणकाच्या ..

घालोनी "फेसबुका"त निजफेस 
"लॉगिन" फेसबुकी आधी करावे ..

"इमेल" "जीमेल" सवडीने पहावे 
"फीमेल फेसा"स आधी निरखावे ..

"रिक्वेस्ट" फ्रेंड-फ्रेंडणीच्या पहाव्या 
डिलीट सत्वरी "फ्रेंड"च्या कराव्या ..

"मेसेज" कुणाकुणाचे ते पहावे 
गरजेनुसार वर्गवारी उघडावे ..

जमेल तेवढे फोटो-काव्य अपुले
नको तिथेही "ट्याग" ते करावे ..

"लाईक" "कॉमेंट" शेअर आधी 
मैत्रिणींच्या "पोस्ट"ला नक्की करावे ..

जमल्यास इतरांच्या वाचोनी पोस्ट
वाटल्यास कॉमेंट लाईक करावे ..

"कॉपीपेस्ट" इतरांचे करावे स्टेटस 
स्वनामे निजभिंतीवरी "अपडेटावे" ..

उघडकीस आले जरी कॉपीपेस्ट 
"सॉरी" म्हणूनी मोकळेच व्हावे ..

लाईक अपुल्या "स्टेटस"वर पहावे 
नसले तरी, ना नाराज व्हावे ..

कॉमेंट करावी दणकून तेथे 
कळेना कुणाला स्टेटस जेथे ..

वादात नित्य आपणही असावे 
शिवी-ओवीने सार्थक करावे ..

स्टेटस अपुले कसलेही लिहावे 
इतरांचे बकवास समजून घ्यावे ..

लाईक इतरांस कमीच द्यावे 
स्वत:स नेहमी अपेक्षित रहावे ..

सर्वात श्रेष्ठ स्वत:सी पुजावे 
इतरांस तुच्छ समजोनी जावे !
.

लिपस्टिक का फेविस्टिक

सकाळपासून बायकोच्या तोंडाचा पट्टा 
अखंडपणे चालूच होता.

शेवटी तिला सिनेमाला घेऊन गेलो !

थिएटरातही गप्प बसेल ती बायको कसली ...

तिथेही 
" आवाज आवाज, शू शू , गप्प गप्प " -
असे आजूबाजूला आवाज येऊ लागले !
तरी हिची टकळीची कुजबुज तार स्वरात चालूच .

अत्र तत्र सर्वत्र एकंदरीत मी हैराण !

एकदाचा घरी आल्यावर हुश्श म्हणत,
मी सोफ्यावर रेलून बसलो .

बायकोचा प्रश्न - " अहो, सकाळपासून मी विचारतेय,
आज मी लावलेली लिपस्टिक छान दिसते की नाही ? "

तिच्याकडे न पाहताच शांतपणे मी उत्तरलो -
" फेविस्टिक त्यापेक्षा अधिक छान दिसली असती ! "
.

खरा पाऊस

"कुठे गेला आहे पाऊस" 
उगाच ओरडता कशाला

डोळा भिडवला आहे का
बळीराजाच्या कधी डोळ्याला ?

कुठे कधी ना दिसणारा तो 
पाऊस तुम्हाला दिसला असता

बळीराजाच्या डोळ्यांमधून  
धो धो अविरत वाहत असता ! 
.