सहमती


माझ्या लग्नानंतर,
पाच-सहा वर्षांनी मित्र प्रथमच घरी आला होता.

मित्राने मला उत्सुकतेने विचारले -
" कसा काय चाललाय संसार? "

मी उत्तरलो,
"मस्त मजेत !
फक्त एकच त्रुटी आहे-
माझ्या कोणत्याही म्हणण्याशी बायको सहमत होत नाही,
पाच वर्षं पूर्ण झालीत लग्नाला, तरीही.... ! "

पदराला हात पुसत पुसत,
बायको स्वैपाकघरातून बाहेर येत म्हणालीच,
" पाच वर्षं नाहीत काही !
सहा वर्ष साडेतीन महिने हो, भावजी ! "
.

४ टिप्पण्या: