काहीतरी संकल्प सोडायचाच ..
ह्या विचारात नव्या वर्षाचा सगळा दिवस वाया घालवला .
रात्री गच्चीवर गेलो.
भ्रमणध्वनी कानाला लावला ..
गाणी ऐकायला सुरुवात केली ,
पहिलेच गाणे सुधीर फडकेंच्या आवाजातले होते.
" तोच चंद्रमा नभात ..."
दुसरे होते .
" कधी बहर कधी शिशीर .."
मग काय !
जी तंद्री लागली...
ओळीने बाबूजींचीच एकापेक्षा एक अप्रतीम गाणी -
अक्षरश: कानात प्राण आणून ऐकत,
२०१३च्या वर्षातली पहिली मध्यरात्र जागवली !
अरेच्चा !
सापडला की हो ....
ज्याच्या शोधात आपण अख्खा दिवस घालवला...
तो,
हाच की आपला संकल्प !
" रोज रात्री तास दोन तास,
आलटून पालटून एकेका गायकाची गाणी निवांतपणे एकणे ! "
. . .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा