परमेश्वर .. एक चिंतन.....


हाकेला धावून जातो, तो परमेश्वर !
अरे देवा ! ..असे म्हटल्याशिवाय, जो प्रगट होत नाही तो परमेश्वर !
धावा केल्यावर धावतो, तो परमेश्वर !

आपणहून कुठे, कधी, कुणाला प्रसन्न झाला आहे का तो ?
संकट, कटकटी, अडीअडचणी असतांना दिसला का तो परमेश्वर !
अश्राप, निष्पाप, कोवळ्या बालक-बालकावर अत्याचार होताना,

 कुठे असतो तो परमेश्वर ?
गरीब माणसाला निर्वस्त्र-

 आणि श्रीमंताला सोन्याचा सदरा का देऊ करतो, तो परमेश्वर !

निर्गुण निराकार असा तो परमेश्वर, इतर बनावट "अवतारां"च्या मागे कसा उभा रहातो ?
म्हाताऱ्याकोताऱ्याच्या मदतीला का धावत नाही हा परमेश्वर !
गरीबांचा वाली असणारा हा परमेश्वर सोन्याच्या मोहात का पडत आहे ?
कनवाळू असा हा परमेश्वर-
 बिलंदर, घोटाळेबाज, थापाड्या, ४२० लोकांच्याच सानिध्यात रहावे वाटते का ह्या परमेश्वराला !

त्याला आळवणारे दीन दरिद्री गरीब वारकरी दर्शनापासून..

 लांब मैलावर रहातात.
आयुष्यात ज्यांनी कधी कुणाला आत्मीयतेने जवळ केले नसेल,
अशा माणसाला मात्र तो परमेश्वर अगदी पायाशी कसा काय येऊ देतो !

भेदभाव करणारा आहे का हो आपला हा परमेश्वर !
गरीबाला जास्त दरिद्री आणि श्रीमंताला सोन्याच्या गादीवर लोळायला....

 मदत करतो का हो आपला परमेश्वर !

ह्या कलीयुगात तर त्याचा साधा अवतारही पहायला मिळत नाही .
ज्याला अवतार म्हणून जवळ करावे, तो नंतर....

 चपला-बुटानी, लाथा-बुक्क्यांनी मार खाण्याच्या लायकीचा निघतो !

अरे देवा !
 काय करू सांग बाबा !
भलते सलते विचारांचे भुंगे तरी शिरू देऊ नकोस..

 आमच्या डोक्याच्या पोकळीत !
.

२ टिप्पण्या: