आमचे(ही) काळजीवाहू सरकार


कळले नाही
कधी झोपलो
चिरनिद्रा जणु आली..


किती काळजी
मम पत्नीला
आठवण तिजला झाली -


पत्नी विचारी
गद्गद हलवून
"कसे झोपला तुम्ही !


निद्रानाशाची
ही गोळी,
आज विसरला तुम्ही !" ..

.

आंबेखरेदी


आंबेखरेदीसाठी मंडईत गेलो की, 
उगाच सराईताचा आव आणत,
दोनचार बागवानाकडे चकरा मारायच्या .


नंतर एखाद्यापुढे उभे रहायचे ..
आणि पठडीतले "मैं हरसाल तुम्हारे यहांच आम लेता हूं " हे वाक्य ऐकवायचे .


"मुझे तो मालूम है ना साब "..असे म्हणत -
जन्मजन्मांतरीची ओळख असल्याचा आव आणत,
तो इरसाल बागवानही हमखास,
"आधीच बाजूला काढून ठेवलेला, नमुन्याचा एक आंबा"
रस पिळायला काढतो.. 


अहाहा ! दिलखुश !! तो नमुना अगदी गोड असतोच !!!

इतरही नजरेत भरण्यासारखे "हे घेऊ, का ते घेऊ" आंबे नजरेसमोर असतात .
पण- आपल्यातला "साब " खूष होऊन,
त्या बागवानावर विसंबून,
विश्वासाने आपण आम्रखरेदीचा सोहळा आटोपतो.


चार चार वेळा आपण त्याला बजावतो....
" चांगले नाही निघाले तर बघ हं ..
सगळेच्या सगळे परत आणून देईन !"


तो बिलंदर बागवानही मुंडी हलवत,
छातीठोकपणे प्रत्येक आंबा अगदी-
"आपल्या स्वभावासारखाच गोड" असल्याची ग्वाही/खात्री देतो..


- आणि अर्धा डझन जास्त आंबे ...
आग्रह करू करू आपल्या गळ्यात मारतोच !


.....घरी आलो की नेहमीचीच रडकथा !

" आज काही आंबा चांगला नव्हता /
आंबटच रस आहे /
हापूस वाटत नव्हताच तरी मला /
किती पाणचट रस आहे /
धडाभर साखर घातली तेव्हा कुठे असा बरा लागतोय हो ..." 

- एकेक कॉमेंट कानावर आदळते .

..........आपण पामर बिचारे खाली मान घालून,
मनातून त्या बागवानाला शिव्या हासडतच -
घरच्या शिव्या निमूटपणे, त्या रसाबरोबर गिळत/खात राहतो !
.

दोन चारोळ्या - -

'आई -'

आपल्याच तंद्रीत रस्त्यामधे
ठेच लागुनी बोट ठेचते -
आईऽ ग, तुझीच आठवण होते
चिमूट हळदीची समोर नाचते ..
.

स्थितप्रज्ञ -

येतील ऋतू सरतील ऋतू 
बघतील अज्ञ सर्वज्ञ -
राहीन एकटा फुलत कधीही 
मी गुलमोहर स्थितप्रज्ञ ..

.
 सयेतील ऋतू सरतील ऋतू 
बघतील अज्ञ सर्वज्ञ -
राहीन एकटा फुलत कधीही 
मी गुलमोहर स्थितप्रज्ञ ..रतील ऋतू 
बघतील अज्ञ सर्वज्ञ -
राहीन एकटा फुलत कधीही 
मी गुलमोहर स्थितप्रज्ञ .. ऋतू सरतील ऋतू 
बघतील अज्ञ सर्वज्ञ -
राहीन एकटा फुलत कधीही 
मी गुलमोहर स्थितप्रज्ञ ..

येतील ऋतू सरतील ऋतू 
बघतील अज्ञ सर्वज्ञ -
राहीन एकटा फुलत कधीही 
मी गुलमोहर स्थितप्रज्ञ ..

येतीलयेतील ऋतू सरतील ऋतू 
बघतील अज्ञ सर्वज्ञ -
राहीन एकटा फुलत कधीही 
मी गुलमोहर स्थितप्रज्ञ .. ऋतू सरतील ऋतू 
बघतील अज्ञ सर्वज्ञ -
राहीन एकटा फुलत कधीही 
मी गुलमोहर स्थितप्रज्ञ ..


.

चित्रकार पिंटू .. [बालकविता]


आमचा पिंटू चित्रकार छान
चित्र काढताना पाठीची कमान ..


जिराफाला असते गेंड्याची मान
उंटाला दिसती हत्तीचे कान .. 


भूभूचे शेपूट सरळ असते
हम्माचे शेपूट वाकडे दिसते ..


मोरपिसारा कोंबड्याला असतो
कोंबड्याच्या तुऱ्याचा पत्ता नसतो .. 


झुरळ असते काढलेले हातभर
मिशा त्याच्या फक्त चिमूटभर ..


हत्तीचे पाय इवल्याशा सशाला 
बगळ्याचे पाय नेमके सिंहाला .. 


मुंगीचा डोळा वाघाला दिसतो
घुबडाचा डोळा चिमणीला असतो ..


चित्र रंगवताना डोलते मान
म्हणतो स्वत:च "वा वा छान"..


चित्रात भरताना विविध रंग
स्वत:चे भरतो रंगाने अंग..


आमचा पिंटू चित्रकार छान
मोठ्ठा झाल्यावर होणार महान .. !

.

प्रीतीचा लागला फुटू अंकूर मनात माझ्या [गझल]

प्रीतीचा लागला फुटू अंकूर मनात माझ्या
माजू पाहे असे कसे काहूर मनात माझ्या

आकाशाला भुईवरी टेकेल क्षितीज तेथे      
लाडीगोडी अवीटशी सुमधूर मनात माझ्या

जोडीने मी फिरू कसे उद्यान अजून जागे 
टकमक बघती कशी फुले हुरहूर मनात माझ्या

झाडाखाली विसावलो दोघेहि उन्हात जेव्हा
बरसत गेल्या सखे सरी भरपूर मनात माझ्या

हात धरुनिया तुझा सखे हातात खुशाल माझ्या
तारा झंकारल्या जगी संतूर मनात माझ्या

आपण दोघे नदीतुनी प्रतिबिंब पहात होतो
केली चंद्रान त्या किती कुरकूर मनात माझ्या

दोघांमधली उणीदुणी आयुष्यभरात विसरू   
जोडी माझी तुझ्यासवे हा सूर मनात माझ्या ..
.

अरे लबाडा


अरे लबाडा
गुलाबा,

तिच्या हातात
जाताना

कित्ती छान उमलतोस -

माझ्या हातात
मात्र

जाता जाता
नेमका

काटा कसा टोचतोस ...!
.

दोन हायकू -

१.
क्षणभंगुर
वासनेचा अंकुर
बळी निष्पाप  ..

२.
सावधगिरी
बाळगणारी नारी
नर मदांध  ..
.

सुट्टी म्हणजे-


सुट्टी म्हणजे नुसती धमाल
पर्यटनाची भलती कमाल ..

गडावर जाऊ शिकू इतिहास
भुगोलातले प्रदेश खास ..

बसू घरात ऊन असल्यावर
पत्ते क्यारम गार फरशीवर ..

टीव्हीवर एनजी डिस्कव्हरी
डोरेमोन भीम बीनची मस्करी ..

अधूनमधून भेंड्या नि गाणी
आईस्क्रीम आणिक लिंबूपाणी ..

पुस्तकं वाचू खूप छान छान
माहितीची करू देवाणघेवाण ..

संध्याकाळी खेळू बागेत खेळ
खेळून खाऊ बागेबाहेर भेळ ..

सुट्टी म्हणजे क्रिकेट खेळणे
अभ्यासाशी गट्टी फू करणे ..

.

माधुरीचा वाढदिवस

फेसबुकात तोंड खुपसलेली बायको
 किंचाळलीच जवळजवळ ..

मी हातातल्या पुस्तकातून तोंड फिरवत,
चमकून तिच्याकडे पाहिले आणि विचारले -
"काय ग, 

झाल तरी काय एवढ किंचाळायला तुला ?"

तशी ती आश्चर्याने उद्गारली -
"बै बै बै ...कित्ती कित्ती त्या शुभेच्छा -
त्या मेल्या माधुरीच्या वाढदिवसासाठी,
सगळे देत सुटलेत हो ? "

मी म्हटल -
" देणारे देत सुटलेत .. 

तुझ काय बिघडल त्यात ?"

ती उत्तरली -
" अस कस अस कस .. 

अहो, देणारे ढिगाने देतील हो .
ती बया ढुंकून तरी बघणार आहे का, 

ह्या असल्या फुक्कटच्या कुणाच्या शुभेच्छा ?
कळत का नाही ह्या सगळ्या फेसबुक्याना ? "

फेसबुकातल कुणाला कुणाला 

काय अन किती कळतंय,
ह्या वादात मला पडायचं नव्हतच ..

तिला उत्तर न देताच,
मी मुकाट हातातल्या पुस्तकात तोंड खुपसून राहिलो !
.

माझी(ही) फेसबुकी प्रतिज्ञा

फेसबुक माझा प्रांत आहे .
सारे फेसबुकी माझे समीक्षक आहेत .
फेसबुकातल्या फक्त माझ्याच स्टेटसवर माझे प्रेम आहे .

फेसबुकातल्या माझ्या स्टेटस आणि विविधतेने नटलेल्या

 माझ्या फोटोंचा मला अभिमान आहे .
माझ्याच स्टेटस आणि फोटोना लाईक करण्याची पात्रता इतरांच्या अंगी यावी,
म्हणून मी सदैव कॉमेंट करीन

मी माझ्या ट्यागवाल्यांशी आणि कॉपीपेष्टवाल्यांशी 

खूचच जवळीक साधेन आणि
प्रत्येकाशी गळेपडू सौजन्याने वागेन ..

माझे फेसबुक आणि माझे फ्रेंडफ्रेन्डणी यांच्याशीच

 निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे ..
त्यांच्या स्टेटस आणि प्रोफ़ाईलपिकला लाईक आणि कॉमेंट ,
ह्यातच माझे अस्तित्व सामावले आहे !
.

छोटू सरदार ... [बालकविता]

लटके कमरेवर तलवार
ऐटीत फिरे छोटू सरदार ..

समोर दिसता माशा झुरळे
म्यानातून निघे तलवार ..

सपसप होती हवेत वार
माशा झुरळे मरती चार ..

हाs हाs हसे छोटू सरदार
कौतुक करी सारे घरदार ..

"भोsभोs"आवाज भुभुचा कानी
गडबडतो छोटू सरदार ..

हातची फेकुन देई तलवार
पदराआड आईच्या पसार .. !
.

बदलाची गरज

पहाटे सर्वात आधी उठून,
सडारांगोळी आटोपून,
रात्रीची उष्टीखरकटी काढून,
आवराआवरी करून,
 दिवसभरात पाठ टेकायला क्षणाची उसंत न मिळता
राबराबणा-या सुगृहिणीचे कौतुक करावे तितके थोडेच !

घरात व हपीसात संधी मिळताच,
डुलकी घेऊ पाहणारा पुरुषवर्ग घरात मात्र,
गृहिणीला इकडची काडी तिकडे हलवण्याची मदत न करता -
"अग ए, रुमाल कुठे ठेवलास ,
इस्त्रीचे कपडे आले का,
डब्याला हल्ली रोजच उशीर का होतोय... "
असले महत्वाचे फालतू प्रश्न विचारत,
अर्धांगीला हैराण करत असतो !

सन्माननीय अपवाद वगळता,
घरोघरी हेच चित्र,
काळ बदलत चालला तरी,
का दिसतेय !
.

खातेस घरी तू जेव्हा -

(चाल- नसतेस घरी तू जेव्हा -)

खातेस घरी तू जेव्हा
जीव घाबराघुबरा होतो 
उरण्याचे होती वांधे
पोटात गोळा का येतो ..

डिश फुटून खाली पडावी
का तोल मना बिघडवतो
तोबरा मनी हीन वाटे
अन खंत वाटता रडतो ..

येतात पाहुणे घराशी
धुसफुसून सरती मागे
चिडकीशी गाठच आता
तव फंडा आठवत जातो ..

तव हालचाली बोकण्याच्या
मज डसती हजार वेळा
जीव जाई तरी हादडावे
मी बघ्याच नुसता उरतो ..

तू लांब राहशिल काय
सोडूनच या घरदारा
सगळ्यांचा जीव भकास
माझ्यासह उपास घडतो ..

ना अजून झालो तगडा 
का दुष्काळातुनी आलो
तुज पाहुन समजत जाते
खाण्यास जन्म हा घडतो !
.