बदलाची गरज

पहाटे सर्वात आधी उठून,
सडारांगोळी आटोपून,
रात्रीची उष्टीखरकटी काढून,
आवराआवरी करून,
 दिवसभरात पाठ टेकायला क्षणाची उसंत न मिळता
राबराबणा-या सुगृहिणीचे कौतुक करावे तितके थोडेच !

घरात व हपीसात संधी मिळताच,
डुलकी घेऊ पाहणारा पुरुषवर्ग घरात मात्र,
गृहिणीला इकडची काडी तिकडे हलवण्याची मदत न करता -
"अग ए, रुमाल कुठे ठेवलास ,
इस्त्रीचे कपडे आले का,
डब्याला हल्ली रोजच उशीर का होतोय... "
असले महत्वाचे फालतू प्रश्न विचारत,
अर्धांगीला हैराण करत असतो !

सन्माननीय अपवाद वगळता,
घरोघरी हेच चित्र,
काळ बदलत चालला तरी,
का दिसतेय !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा