पडली एकच ठिणगी उरात - [गझल]

मात्रावृत्त- पादाकुलक
मात्रा- ८+८
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

पडली एकच ठिणगी उरात
काच तडकली का जीवनात ..

गेलो मुठीत मिठीतून मी
नकळत शिरली ती का मनात ..

ऊन संपता वाढे थंडी
येतो हाती सखीचा हात ..

उरल्या जखमा प्रेम सोसले
बसलो मिरवत मीच हृदयात ..

धरता हाती साप न डसला
डसली दुरून माणूस जात ..
.

४ टिप्पण्या:

 1. फार मार्मिक गझल...
  खरोखर हल्ली प्राण्यांपेक्षा माणसाचं माणसाला डसणं वाढलंय...

  उत्तर द्याहटवा
 2. विजयकुमार सर...
  माझं नाव देवेंद्र जाधव...
  मी नुकताच या Blog विश्वात प्रवेश केला आहे...
  तर कृपया तुम्ही माझे Blog कसे आहेत ते सांगावे...
  devendra4.blogspot.in
  ही माझी Blog Site आहे...
  कृपया Comment Box मध्ये तुमची प्रतिक्रिया नोंदवावी...
  तुमच्या प्रतिक्रियेची मी आतुरतेने वाट पाहील

  उत्तर द्याहटवा