नकोस जाऊ हिरमुसून तू "लाईक" नाही येत म्हणून -- [हझल]

नकोस जाऊ हिरमुसून तू "लाईक" नाही येत म्हणून 
एक तरी "लाईक" मिळावा पाच "कॉमेंटस" बघ टाकून ..

का घाबरशी "पोक" जरी तू आले त्याचे तुजला शंभर 
शांत रहावे बिनधास्तपणे तूही त्याला "पोस्ट" "ट्यागू"न ..

"पोस्ट" लिहीणे जमे न तुजला हरकत काही नाही आता 
येता जाता खुशाल बघ तू "जीएम" अन "जीएन" लिहून ..

"स्टेटस" अपुले छानच असता कशास करतो मनात चिंता 
"कॉपीपेस्ट" अन "व्हाटसप"चे उदंड ये घे पीक जाणून ..

"मस्त" "वाहवा" "छान" असे जर लिहिले "स्टेटस"वरती कोणी 
ना आवडली "पोस्ट" तयाची "झकास" "वॉव" तू दे ठोकून ..

नसेल फिरकत तुझ्या "वॉल"वर नकोस फिरकू तूही त्याच्या 
आपण जशास तसे व्हायचे अनोळखीसे ओळख असून ..

"लाईक" द्याव "लाईक" घ्याव चालू आहे परंपरा ही   
देवघेव पण अशी चिरंतन जाते सर्वांना आवडून ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा