खरोखर जगी का खुळे वाढलेले
शहाणे कमी का दिसू लागलेले ..
कशाला उगाळू जुने दु:ख माझे
सुखी जीव सारे मला वाटलेले ..
भरारी नभी मी कशी आज घेऊ
कुणी पंख माझे कधी छाटलेले ..
किती छान वाटे शवाला स्मशानी
स्तुती सोहळे हे असे रंगलेले ..
न आले कधी ते मला पाहण्याला
कळालेच त्यांना खिसे फाटलेले ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा