माझ्या घरात हे चित्र दिसते
प्रत्येक एक
तारखेलाच असते
बायको येरझाऱ्या घालत असते
मी येण्याची वाट
पहात असते
माझ्यासमोर गिरक्या
घेत असते
जमेल तेवढ्या
फिरक्या घेत बसते
तिचा चेहरा किती हसरा असतो
माझा कसा नेमका पडेल दिसतो
नजर माझी तिच्यावर खिळलेली
तिची माझ्या पाकिटावर रोखलेली !
दोन तारखेपासून
बदलते चित्र
दोघांतले बोलणे
होते विचित्र
ती आपल्याच तोऱ्यात
असते
ढुंकूनही माझ्याकडे पहात नसते
माझी तिच्यावर नजर
असते
रिकामे पाकीट
हसत असते !
.
ase sarvch gharat naste
उत्तर द्याहटवाकाही घरात असते.
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल आभार .