आला पहा कवी तो -
दिसला पहा कवी तो -
उलट्या दिशेस पळतो
पाहून त्यास जो तो !
इकडून सिंह आला ;
तिकडून बघ कवी तो
सिंहासमोर जो तो
जबड्यात शिरु पहातो !
का वाटते कवीचे
भय फार सज्जनाला
वाळीत का कवीला
तो टाकण्यास बघतो !
जखमी कधी कुणाला
ना वार करि कुणावर
अध्यात ना कुणाच्या
मध्यात तोच नसतो !
आली जरी त्सुनामी ;
लाटांवरी तियेच्या
हळुवार तो मनाने
कविता करीत असतो !
ती एक ठेच साधी
जखमी तुम्हांस करते
डोळ्यात अश्रु कविच्या -
कवितेतुनी टपकतो !!
.
[अर्थ - मराठी ई दिवाळी अंक २०१७]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा