पुढारी.. आणि डोके ?
'डोके दुखते औषध द्या हो'
एक पुढारी वैद्यास म्हणाला,
'अशक्य डोकेदुखी तुम्हाला'
हसून वैद्य तयास म्हणाला !
.
खोटेपणा -
"दु:ख म्हणजे काय"
विचारीतसे विवाहित -
लग्न करून त्याला/तिला
इतकेही नसावे माहित ?
.
असे का -
दुसऱ्याच्या मदतीला धावायला
दोन पाय असून नसतो तयार -
दुसऱ्याचे वाईट करायला मनुष्य
एका पायावरही असतो तयार ..
.
बाळपणीचा काळ सुखाचा -
धावत येते कसे दुडूदुडू
बालपणीचे हास्य परतुन ,
आरशात हसुन कसे पाहती
आजोबा कवळी हळूच काढुन ..
.
'डोके दुखते औषध द्या हो'
एक पुढारी वैद्यास म्हणाला,
'अशक्य डोकेदुखी तुम्हाला'
हसून वैद्य तयास म्हणाला !
.
खोटेपणा -
"दु:ख म्हणजे काय"
विचारीतसे विवाहित -
लग्न करून त्याला/तिला
इतकेही नसावे माहित ?
.
असे का -
दुसऱ्याच्या मदतीला धावायला
दोन पाय असून नसतो तयार -
दुसऱ्याचे वाईट करायला मनुष्य
एका पायावरही असतो तयार ..
.
बाळपणीचा काळ सुखाचा -
धावत येते कसे दुडूदुडू
बालपणीचे हास्य परतुन ,
आरशात हसुन कसे पाहती
आजोबा कवळी हळूच काढुन ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा