चाहूल वार्धक्याची -
हिरव्यागार वृक्षावरून
घरंगळले एक पिवळे पान -
अंधुकशा माझ्या नजरेने
पाहिले विसरून देहभान ..
.
घमेंड -
हातच्या मोगऱ्याच्या सुगंधाची
नसावी घमेंड कधी ती -
मोहवते निवडुंगाचे फूलही कधीतरी
असावी जाणीव मनी ती ..
.
आठवण -
हाती जुनी वही लागली
माझी नजर का हपापली -
जीर्णशी एक फूलपाकळी
आठवणीने तुझ्या चपापली ..
.
हिरव्यागार वृक्षावरून
घरंगळले एक पिवळे पान -
अंधुकशा माझ्या नजरेने
पाहिले विसरून देहभान ..
.
घमेंड -
हातच्या मोगऱ्याच्या सुगंधाची
नसावी घमेंड कधी ती -
मोहवते निवडुंगाचे फूलही कधीतरी
असावी जाणीव मनी ती ..
.
आठवण -
हाती जुनी वही लागली
माझी नजर का हपापली -
जीर्णशी एक फूलपाकळी
आठवणीने तुझ्या चपापली ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा