एकच मित्र असा मिळावा ..

संकटकाळी हात देशील
अडचणीत मदत घेशील -

चहाडी चुगली कानावर हात
मैत्रीत नसते जातपात !

मैत्रीला लागत नाही कात्री
असते मैत्रीत  पक्की खात्री -

मित्रात जेव्हां अतूट मैत्री
विश्वासाची पक्की खात्री !

 उपकार होतील खूप  तुझे
 देवा,  एकच   मागणे  माझे -

एकच मित्र असा मिळावा
कृष्ण-सुदामा आदर्श रहावा !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा