तीन चारोळ्या

निळे निळे तुझे ग डोळे
पसरतेस त्यांचेच जाळे-
बनतेस कुशल पारधी तू 
शिकार माझी तुला मिळे..
.


सरावलेले पाय हे माझे
वाट दुःखाची चालायला -
ठेचकाळता सुखास आडव्या
का लागती विव्हळायला ..
.


बडबडणे, ना काही करणे, 
बाणा अमुचा खास असे -
काही कामे करती दिसता 
खीळ घालणे ध्यास असे ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा