१. कुणाच्या खांद्यावर -
जगतांना सगळे मजला म्हणत
" आम्ही तुझे- , आम्ही तुझे- "
मरतांना ऐकले पुढचे शब्द
" - वाहिले ओझे , - वाहिले ओझे " !
" आम्ही तुझे- , आम्ही तुझे- "
मरतांना ऐकले पुढचे शब्द
" - वाहिले ओझे , - वाहिले ओझे " !
२. फरक -
फरक नाही काही पडत
सुखात तुझ्या ग येण्याने -
दु:ख मला बिलगून रहाते
उरात तुझ्या ग जाण्याने !
फरक नाही काही पडत
सुखात तुझ्या ग येण्याने -
दु:ख मला बिलगून रहाते
उरात तुझ्या ग जाण्याने !
३. समाधान-
देणा-याने झोळी समोरच्याची पहावी
घेणा-याने ओंजळ देणा-याची पहावी -
दोघांची संतुष्ट देवघेव पाहून
पहाणा-याने समाधानाची ढेकर द्यावी !
घेणा-याने ओंजळ देणा-याची पहावी -
दोघांची संतुष्ट देवघेव पाहून
पहाणा-याने समाधानाची ढेकर द्यावी !
४. पौर्णिमेचा चंद्र -
आकाशाकडे टक लावून
ते पौर्णिमेचा चंद्र पहातात -
मी तुझा चेहरा पाहून
घेतो पौर्णिमेचा चंद्र हातात !
ते पौर्णिमेचा चंद्र पहातात -
मी तुझा चेहरा पाहून
घेतो पौर्णिमेचा चंद्र हातात !
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा