उतावळा नवरा..


उतावळा नवरा..
 त्याला कुणीतरी आवरा !

उगाच आपल्या मित्रमंडळीत बसून,
फुशारक्या मारत बसतो..

बायको ---
उठल्यापासून सकाळी
सडासारवण, रांगोळी
तुमच्या आणि पोरांच्या अंघोळी
सकाळची कामं हातावेगळी
करूनच-
न्याहारी, स्वैपाक, जेवण, डबे, दप्तर, इस्त्रीचे कपडे, मोजे, रुमाल-
आणखी इतर काय काय कामाची कमाल-
न कुरकुरता करत असते !

नवरा ---
फक्त टेहाळणी करत,
तिच्यावर डाफरण्याचे काम
इमानेइतबारे करत असतो !
शान मारत,
सगळे आयते झाल्यावर/ मिळाल्यावर,
कामावर म्हणून पळ काढतो ...

पुन्हा संध्याकाळचे रहाटगाडगे
बायकोच्याच जिवावर चालू रहाते..

....आणि न केलेल्या कामांची यादी ऐकवत,
पुन्हा नवरोजी हुश्श करायला मोकळेच !

दिवसभर राबराबणाऱ्या बायकोला
विश्रांती, आयता चहाचा कप मिळण्यासाठी ....

रहाटगाडगे उलटे कधी आणि कोण फिरवणार हो...... ???
.

६ टिप्पण्या:

  1. लेखन प्रपंच चांगला जमून आला आहे. घरच्या बाईची व्यथा योग्य मांडली आहे.
    रहाट गाड उलट फिरवायचा म्हटलं तर ते त्या तिलाच कराव लागणार आहे. कुणी आल तर तीच नशीब.

    उत्तर द्याहटवा