गरम गरम वाफाळत्या चहाचा कप माझ्या हातात..
तोही मस्त उबदार थंडीच्या जाणिवेत..
हव्या हव्या वाटणाऱ्या क्षणी ?
वा !
पण खरोखरच बायकोने अगदी अशीच सुवर्णसंधी....
आज सकाळी सकाळी,
ठीक ७ वाजून ३१ मिनिटांनी
आणली खरी !
बायकोबद्दलच प्रेम इतकं उफाळून आलं होतं, म्हणून सांगू !
चहाचा पहिला घोट घेतला आणि....
बायकोकडे सहेतुक पाहिलं -
तिच्याही ते लक्षात आलं...
मुळातच ती हुषार, शहाणी, हजरजबाबी, समयसूचकत्व जाणणारी, मनकवडी आहेच मुळी !
चहात नेहमीपेक्षा "चौपट साखर" घातलेली !
माझ्याकडे पहात, बायको उत्तरली -
"एवढ्या सकाळी पेढे कुठून आणू... ?
अहो, कसाबला आताच फाशी दिल्याची बातमी ऐकली ! "
.
कसाब तो सिर्फ झाकी हे , अफजल गुरु अभी बाकी हे..
उत्तर द्याहटवानिनाद,
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल आभारी आहे .