रविवार आज हा रविवार
किती छान छान हा वार
अभ्यास नाही शाळा नाही
खूप मजेचा आज हा वार !
मारामारी आणि ती कुस्ती
येतच नसते मुळीच सुस्ती
खेळ खेळण्याची होई कमाल
दिवसभर नुसती येई धमाल !
चोविस तास हो खाणेपिणे
नाचणे निवांत अन् हुंदडणे
गट्टी फू त्या अभ्यासाशी
कट्टी फक्त खेळण्यांशी !
नाही धपाटा आईचा
नाही रट्टा बाबांचा
ताईचे ऐकायचे नाही
दादाशी बोलायचे नाही !
दोस्तमंडळ झिंदाबाद
मौजमस्ती झिंदाबाद
धिंगाणा गाणे गाणी
रंगीत फुग्याची पिपाणी !
रविवार आज हो रविवार
आमचा आवडता हा वार
घरात आणि मैदानावर
दंगामस्ती खूप होणार !
.
खूपच छान
उत्तर द्याहटवाआपल्या प्रतिक्रियेमुळे आनंद वाढला, डॉक्टरसाहेब !
हटवाधन्यवाद .