खट्याळ काळजात घुसली -



कपाळावरच्या अवखळ बटा
हलकेच  मागे सारताना -

पापण्या फडफडशी नवलाईने
मजकडे कौतुके बघताना
 
 गालावरच्या  नाजूक खळीने  
पोटात खड्डा पाडताना ,
 
निजहनुवटीवर बोट टेकवशी  
 आरामात कुजबुज ऐकताना -

जरी न घडले काहीतरी
मान मनोरम वेळावताना ,

कुशल अभिनेत्रीच्यावर
भाव चेहऱ्यावर आणताना -
 
भोळीभाबडी होउनिया ग  ... 
कितीदा जखमी करशील तू !

.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा