१. पंचाईत -
नवस देवांना करून राहिलो
कार्य सिद्धीस घेऊन बसलो -
कुठल्या देवाला काय बोललो
हेच नेमके विसरून बसलो ..
.
२. मत्सरी कुठले -
तुझे प्रेम माझ्यावर
माझे प्रेम तुझ्यावर -
होऊ दे बघणाऱ्याच्या
ओझे ते डोळ्यावर ..
.
३. नशिबावर हवाला -
बुडणाऱ्याने बुडत जावे
बुडवणाऱ्याने बुडवत रहावे -
बुडणाऱ्याने बुडता बुडता
नुसते कपाळ बडवत रहावे ..
.
४. वंदन -
अंकुर भुईतल्या बीजाला जडवतो
फूल फांदीवरच्या कळीचे साकारतो -
बाळ पोटातल्या जिवाचे घडवतो
"अनाम कर्त्याला" त्या वंदन मी करतो ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा