स्वत: गणपतीने आपल्या आईवडिलाभोवती प्रदक्षिणा घालून ती विश्वप्रदक्षिणा जाहीर केली,
हे सर्व जर "सुशिक्षित" (?) भाविक खरे मानतात,
तर.....
आपल्या घरातला गणपती जागृत असणारच-
आणि तोच आपल्या विश्वासाला नवसाला पावणार,
अशी दृढ श्रद्धा बाळगण्यात का कमीपणा वाटून घेत असतील बरे ?
त्यासाठी...
पैसे खर्च करून रांगेत उभे करून,
तासनतास वेळ घालवून,
तथाकथित जागृत/नवसाला पावणाऱ्या राजा/महाराजा गणपतीसमोरच्या
निर्बुद्ध/बिनडोक अशा कार्यकर्त्याकडून ...
ऐन दर्शनाच्यावेळी ढकलले जाऊन/असभ्य/ अमानुष/ गैरवर्तणूक सहन करून...
शिकले सवरलेले/शहाणपणाने वागणारे/समंजस सुशिक्षित
आपली बुद्धी का आणि कुठे बरे गहाण ठेवतात ?
"झी २४ तास"वरचे गणेश दर्शन घेणाऱ्या भक्तांचे चित्रित दृष्य पाहून असे वाटले की,
"जागृत" भाविक जनतेने "त्या" ढकलाढकली करणाऱ्या कार्यकर्त्यालाच बाप्पासमोर लाथाबुक्क्यांनी चांगले तुडवायला हवे होते !
महिला , पुरुष , मुले..
कुणाचाही मुलाहिजा न ठेवता तो कार्यकर्ता महिलांच्या अंगाला धरून ढकलत होता !
सगळे भाविक भक्त इतके सहनशील आणि आंधळे !
एकालाही त्यालाच धरून ठोकावे वाटले नाही ?
स्वत:च्या अंगाला धरून ढकलणाऱ्या त्या पोलीस महिलेनेही....
हे का सहन केले सगळे ?
सर्वात वाईट वाटले...
ही सर्व गैरवर्तणूक दाखवणाऱ्या आणि टीआरपी वाढवून घेणाऱ्या
मिडीयावाले असली अमानुष वागणूक बघून का विरुद्ध उभे राहिले नाहीत ?
जनजागृतीही करत असतात ना हे मिडीयावाले ?
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा