तीन चारोळ्या

पारध -

निळे निळे तुझे ग डोळे 
पसरतेस त्यांचेच जाळे -
पारधी तू आणि सावज मी 
शिकार अलगद तुला मिळे ..
.

तुझे असून तुजपाशी --

देऊळ आहे कोठे विचारत 
फिरलो उगाच इकडे तिकडे -
बोट सर्व ते होते दाखवत 
का माझ्याच ते घराकडे ..
.

'घायाळ -'

वर्षाव तुझ्या प्रेमाचा 
अन सुगंध सहवासाचा -
तव तीर सतत नजरेचा 
घायाळ मी जन्मभराचा ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा