अग, संसार संसार
फेस पुरे फेस्बुकावर -
करणार का भाकर
बंद करुन कॉम्प्यूटर ?
कासावीस झालो बघ
भूक लागली भयंकर -
येत आहे ग चक्कर
लॉग औट हो लौकर !
अहो, संसार संसार
मला होईल उशीर -
बघा ना ह्या चारोळ्यावर
लाईक कॉमेंट भरभर !
खूप भूक लागली का हो ?
व्हा ना लौकर तयार -
गडे, हॉटेलात द्याना
पार्सलची ती ऑर्डर !
.
अप्रतिम !!!
उत्तर द्याहटवाप्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद !
उत्तर द्याहटवा