तीन चारोळ्या -

आकाशाची उपमा देत नाही 
प्रेम माझे इतके लहान नाही -
क्षितीजापार आपण गेलो जरी 
प्रेम उरेल माझे त्या पलीकडेही..
.


चार ओळी मनातल्या
खरडल्या तुझ्यासाठी -
शब्दशब्द बनले सखे, 
गीत छान तुझ्या ओठी ..
.


पडणार सखे पाऊस तिथे 
रमणार कल्पनेत मी इथे -
भिजणार चिंब चिंब तू तिथे 
होणार रोमांचित मी इथे ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा