१) 'कोडे -'
तुझे क्षितीज दूर पश्चिमेकडे
माझे असू दे इकडे पूर्वेकडे -
दोघांना जोडणारे मनाचे आकाश
सखे, आपल्यासाठी नसू दे कोडे . .
.
२) 'हर्षोन्माद -'
दोनोळी एक तुझ्यावर मी
लिहून ठेवली, सखे -
गझल लिहिल्यासम तू
नाचत काय सुटलीस, सखे . .
.
३) 'सत्यात कधी -'
पाऊल एकामागे एक
गुंफुन हात सखे हातात -
सप्तपदी ग कितिदा झाली
थकलो चालुन मी स्वप्नात ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा