मागील वर्षी गुलबर्गा येथे मावसभावाकडे गेलो होतो.
बरोबर अर्थात बायको होतीच.
गप्पा मारता मारता,
उत्सुकतेने बायकोने त्याला विचारले-
"काय हो, तुमच्या कर्नाटकच्या एमएसईबीचं लोडशेडिंग किती तास असत ? "
मावसभाऊ हसतच उद्गारला -
"वहिनी , आमच्याकडे एमएसईबीचं लोडशेडिंग कसे असेल ?"
बायकोची ट्यूब लौकर पेटली नाहीच !
त्याला कळत नसल्यासारख समजून ,
बायकोने प्रतिप्रश्न केला-
" कर्नाटकातले हे एवढे मोठे शहर असूनही,
इथे एमएसईबीचा वीज पुरवठा होत नाही ?"
त्या प्रश्नावर मी आणि मावसभाऊ का हसत होतो,
हे काही तिला लौकर कळलच नाही .
शेवटी मावसभावाने खुलासा केला -
"आमच्याकडे एमएसईबी नाही, केएसईबी आहे ना !
पण लोडशेडिंग नाही. "
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा