"राणी" म्हणती तुजला सारे, भांडी घासत चाळीत फिरशी
नाव सांगशी "राजकुमार", "भाकर वाढा-" दारी म्हणशी ..
नाव ठेवले "अजिंक्य" तुझे, कायम अपयश कधी न सरशी
किती छान ग नाव "हर्षदा", खिन्न उदासच आम्हास करशी ..
कसे तुझे ग नाव हे "शीतल", चिडका बिब्बा म्हणवून घेशी
"शांती" ही पण बहीण तुझी, गोंधळ गडबड करत हिंडशी
नावातच चैतन्य तुझ्या सदा आळसामधे लोळशी
शोभत नाही नाव "निर्भया", झुरळ पाहुनी धूम ठोकशी ..
"अमर" तुझे रे नाव कसे, मरणाच्या दाढेतच फिरशी
नाव "हरी" परी मुखातून ,अपशब्दांची धार ओतशी ..
नाम तुझे "रणजीत" तरी - कायम तू पळपुटाच दिसशी
नाव घेउनी "खुशालराव", नेहमी चिंताक्रांतच असशी ..
नाम तुझे ग "अबोली" कसे, अखंड बडबड चालू ठेवशी
नाव "मंगला" परी चांगला विचार ना तू कधीच करशी ..
"विजय " तुझे रे नाव ठेवले , सदा पराजय पत्करशी
दु:ख सदोदित चेहऱ्यावरती, "आनंद" नाव का मिरवत फिरशी ..
"बजरंगा" रे ब्रह्मचारी तू , चार मुले घेऊन हिंडशी
"कार्तिक" नाव तुझे ,पण- भार्या घरात दोन ठेविशी ..
नाम घेउनी "भिकारदास", डनलॉप गादीवरती लोळशी
"सत्यवान" हे नाव घेउनी, नेता बनून असत्य बोलशी ..
"प्रेमा" नाव ग किती छानसे , का तू द्वेषारोपण करशी
नाव "सुमन" पण घरोघरी ,निंदा करत गल्लीत हिंडशी ..
"स्मिता" नाम तू धारण करशी - कायम रडुबाई का असशी
नाव "कोकिळा "छान घेउनी.. कर्कश स्वरात किती ग गाशी ..
"गजानना" तू बुद्धीदाता- सही न जमता, अंगठा ठोकशी
नाव "भीम" पण वजन किलोचे , उचलत घामेघूम तू होशी
"काय आहे नावात ?"..वदला,तो शेक्सपिअर परदेशी
उफराटी ही गंमत ऐशी , नावातूनच घडते कैशी !
.

क्या बात है , सुरेख
उत्तर द्याहटवाधन्यवाद, अमोल .
उत्तर द्याहटवा