मुखी नाम ते एकच येते -
दत्त दिगंबर.. दत्त दिगंबर ..
डोळ्यांपुढती असतो दत्त
डोळे मिटले तरीही दत्त
ध्यानिमनी ते रूप विहरते -
दत्त दिगंबर.. दत्त दिगंबर ..
औदुंबरछायेखाली ते
मनही डोलते तनही डोलते
अनुभूती का अद्भुत येते -
दत्त दिगंबर.. दत्त दिगंबर ..
नाही थारा कुविचारांना
मनी ठेवितो सुविचारांना
रूप पाठीशी उभे ठाकते -
दत्त दिगंबर.. दत्त दिगंबर ..
दत्त नाही जर जीवनात तो
अर्थ काय संसारी उरतो
नाम समाधानातच स्फुरते -
दत्त दिगंबर.. दत्त दिगंबर ..
दत्त दिगंबर.. दत्त दिगंबर ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा