संक्रांतीचा दिवस !
आज कुणावर आलीय कुणास ठाऊक ही संक्रांत,
मनांत विचार करतच ...
........ सकाळी सकाळी देवपूजा आटोपली .
हातात पेपर घेऊन,
खुर्चीवर निवांत चाळत बसलो.
आधीच चहापान झाले होते.
बायको समोर येऊन बसली.
......आणि हातातल्या वाटीतून हलव्याचे पाचसात
दाणे काढून,
माझ्या हातावर टिकवत,
छानपैकी ठेवणीतले हसत म्हणाली -
" तिळगूळ घ्या .........
आज साडी आणायची आहे ना मला ! "
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा