उकाडा मी म्हणत होता !
पेपराने वारा घेत होतो .
फ्यान जरा वाढवत होतो .
तोंडावर येता जाता पाण्याचे हबके मारत होतो .
तरीही आठवडाभर झोप अशी ती आली नाहीच .
शेवटी डॉक्टरला शरण जाऊन,
एकदाची झोपेची गोळी आणून ठेवली !
पण-
बहुतेक उकाडा आणि झोप दोन्हीही घाबरले .....
आणि -
रात्री गोळी घेण्याआधीच,
परवा पावसाचे हलकेसे शिडकावे पडून गेल्याने
इतकी मस्त झोप लागली होती की बस्स !
पण....... हाय रे कर्मा !
आमचं हे "कर्तव्यदक्ष, काळजीवाहू आणि कर्तव्यतत्पर" कुटुंब !
काय सांगू हो तुम्हाला ..
अगदी भर मध्यरात्री-
मी गाढ झोपेत असतानाच ,
मला गदागदागदा हलवून ,
झोपेतून जागे करून-
बायको झोपेची गोळी माझ्यापुढे धरत म्हणाली -
"हं , ही घ्या मिष्टर,
मला 'विसराळू' म्हणता आणि,
तुम्हीच विसरलात ना आज रात्री..
झोपण्याआधी 'झोपेची गोळी' घ्यायला ? "
.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा