सदैव तू पाठीशी त्राता -

सदैव तू पाठीशी त्राता 
भिऊ कशाला स्वामी समर्था 
समाधान शांतीचा दाता  
असशी मजला स्वामी समर्था ..

संकटात मी असता नसता 
स्मरणी स्वामी समर्था 
गेही देही तुझा राबता 
जाणिव स्वामी समर्था ..

वरदहस्त नित तुझ्या कृपेचा   
राहो स्वामी समर्था 
पापपुण्य ना गणती करता 
शरण मी स्वामी समर्था ..  

"श्री स्वामी समर्थ" जपता   
देह पडू दे स्वामी समर्था ..  
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा