पाच चारोळ्या -----

त्रस्त -
नकोशा "आठवणींचे मुंगळे" 
सारखे सारखे येतात -
मनातल्या "विचारगुळा"वर
पुन्हा पुन्हा चिटकतात ! 
.

नेमबाज-
नजरेचा तव एक खडा
पडला हृदयजलाशयावर - 
असंख्य प्रेमतरंग सखे,
उमटू लागले अलगद त्यावर ..
.

प्रकाश-
नकोस करू चंद्रा, गर्व इतका 
अंधारातले जग उजळवण्याचा - 
जग आमचे उजळवण्यासाठी 
उजेड पुरेसा पणतीच्या प्रकाशाचा ..
.

देवालाही भीती - 
नवस केला जागृत देवाला 
संकटातून सोडव मला 
खिन्न होऊन देव म्हणाला
चोरांपासून वाचव मला !
 .

चकणा -
नकोस चालू कंबर हलवत  
भीति वाटते मनातून  ग
डोळे फिरती इकडे तिकडे
गडे मी चकणा होईन ग !
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा