पर्याय आज नाही फुलण्याशिवाय आता .. [गझल]

पर्याय आज नाही फुलण्याशिवाय आता
फुलणार ना फुले ही काट्याशिवाय आता

आश्वासनास देण्या नेता सरावलेला
मतदार राहतो का भुलल्याशिवाय आता

होता अनोळखी पण नात्यातला निघाला
राहील काय येथे घुसल्याशिवाय आता 

पेशा विदूषकाचा पाठीस लागलेला
उरली व्यथा न दुसरी हसण्याशिवाय आता

हुजरेगिरीत सारे आयुष्य काढलेले
होते न काम काही झुकल्याशिवाय आता ..
.

४ टिप्पण्या:

  1. अनिकेतजी,
    आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद !

    उत्तर द्याहटवा
  2. विजय जी आपला लेखन-प्रपंच व्यापक स्वरूपाचा आहे.
    अतिशय सुंदर शब्दांनी फुललेला हा आपला ब्लॉग
    मनोवेधक,अप्रतीम...गझल रचना, हायकू, कविता,बालकविता,
    चारोळी अश्या ब-याचा साहित्यप्रकारांनी बहरलेला आहे.
    प्रथमः आपल्या लेखनिला सलाम...
    असच अविरत सुंदर-सुंदर लेखन करत रहा...
    आपल्याला पुढील वाटचालीकरिता,
    खुप खुप शुभेच्छा...

    डीएसपी...धनंजय शंकर पाटील.
    ता. मंगळवेढा. जि. सोलापूर.

    उत्तर द्याहटवा
  3. धनंजयराव-
    आनंद वाटला आणि वाढला !
    असाच स्नेह लोभ असू द्यावा.
    धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा