कुठेही जा, पळसाला पाने तीनच ..

कुठेही जा, 
पळसाला पाने तीनच ..
हे वचन अगदी सार्थ ठरवले, 
त्या काली माँ कलकत्तेवालीनेही !

कालीमातेच्या दर्शनाची भलतीच ओढ लागून राहिली होती, 
म्हणून कारचालकाला तिकडे गाडी वळवायला सांगितले. 
त्याने देवळाजवळच्या पार्किँगमधे कार उभी करून, 
आम्हाला आपुलकीने सल्ला दिला,
"बाबूजी, इधरउधर ध्यान मत दीजिये । सीधा दर्शनके लाईनमेँ खडे हो जाईये । 
वो पुजारी लोग चारो ओर घूमते हैँ और लूटते हैँ । जरा सम्हालके रहना ।"

दोन मिनिटात आम्ही कालीमातेच्या देवळाबाहेर पोचतो न पोचतो, 
तोच एकापाठोपाठ काही पुजारीमंडळीँचा आमच्याभवती
वावर गलका सुरू झालाच ! 

"दस मिनिटमेँ दर्शन करा देंगे ।"
"लाईनमेँ खडे रहनेकी आपको जरूरतही नही । 
पूजाके लिये खाली पाँच लोगोँके सौ सौ रुपये देना ।" इ. इ.

आम्ही त्यांच्या अखंड बडबडीकडे दुर्लक्ष करत, 
लाईनीत खडे राहिलो...

पुन्हा लाईनीतून देवीला आम्ही "मनोभावे" नमस्कार करत होतो,
तेवढ्यात तिथल्या पुजाऱ्यांचा "मनीभावे"
पुढ्यात आणखी दक्षिणा ठेवण्याचा अत्याग्रह चालूच !

आपल्या महाराष्ट्रातल्या काही प्रसिद्ध देवांची आठवण,
 त्यावेळीच मला का होऊन गेली असावी बरे ! 
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा