कावा मनात गनिमी साधावयास आली
केसात मोगरा ती माझ्यासमोर घाली
थोडी हसून गेली रागात ती जरीही
बेसूर गायनाला हळु दाद की मिळाली
चटणीहि मज मिळाली चतकोर भाकरीवर
बघुनी सुखात जग हे मग झोप गाढ झाली
अफवा कशी पसरली आवड न मज फुलांची
काट्यांसवे घरोबा दुसरा कुणी न वाली
पाहून सरबराई मुक्काम वाढवी तो
पाहून सरबराई मुक्काम वाढवी तो
कटवून पाहुण्याला पुसणार मी खुशाली ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा