प्राधान्य आज मिळते मानात मिळवतीला .. [गझल]

एकांत छान होता दोघांत सोबतीला 
एकांत आज उरला त्याच्याच संगतीला

गाड्यास जुंपुनीया का घेतले विकासा

ओढा विरोधकांचा नेण्या अधोगतीला

नशिबात वाट बघणे अजुनीहि मी सुखाची

दुःखेच आज जमली आहेत पंगतीला 

देवा तुझी कशी रे सापत्न भावना ही

पुष्पे दुजास काटे माझ्याच सोडतीला

हा काळ बदल आहे गृहिणीस स्थान नाही

प्राधान्य आज मिळते मानात मिळवतीला ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा