सहा चारोळ्या -

गजरा माझ्या कवितेचा
नजरेसमोर तरळत गेला - 
सुवास कसा शब्दफुलांचा 
तिच्या मनात हुरळत गेला ..
.

गाठोडे अनुभवांचे पाठी
पक्के बांधून ठेवले होते -
जीवननौका डळमळली तरी 
विपरीत काही घडले नव्हते ..
.

गुरगुरणारा बोका मी 
प्रसिद्ध साऱ्या दिल्लीत -
ताटाखालचे मांजर मी 
प्रसिद्ध साऱ्या गल्लीत ..
.

गणेशचतुर्थीला तुझा
मुखचंद्र मी बघितला -
हृदय तुझे चोरल्याचा
आळ सर्वानी घेतला ..
.

गुलाबाचे फूल हाती धरून
तिच्याजवळ मी बसतो -
भाव माझ्या मनीचा जाणून 
काटा बोटाला डसतो .. 

.

गेली होतीस कुठेतरी 
काही काळच जीवनातुनी-
जीवन बनले होते आळणी 
जेवणासहित आले ध्यानी ..
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा