[मूळ रचना- कोणा कशी कळावी प्रेमात काय गोडी ?...]
सासू कशी पळावी , मी काढु काय खोडी ?
मी नेहमी पुढे, ती मागून पाय ओढी -
लहरीत त्या फिरावे
मी घेत हेलकावे
जाणोनि ऐट माझी, बोटे मुकाट मोडी -
दिसती अजाण डोळे
परि ते लबाड भोळे
माझ्यापुढे पतीला करतील ना चहाडी -
हसलेच मी, रुसे ती
रुसलेच मी, हसे ती
राहील का अशाने सासू-सुनेत गोडी -
.
[सप्तरंग- सकाळ रविवार २२ नोव्हेंबर २००९]
सासू कशी पळावी , मी काढु काय खोडी ?
मी नेहमी पुढे, ती मागून पाय ओढी -
लहरीत त्या फिरावे
मी घेत हेलकावे
जाणोनि ऐट माझी, बोटे मुकाट मोडी -
दिसती अजाण डोळे
परि ते लबाड भोळे
माझ्यापुढे पतीला करतील ना चहाडी -
हसलेच मी, रुसे ती
रुसलेच मी, हसे ती
राहील का अशाने सासू-सुनेत गोडी -
.
[सप्तरंग- सकाळ रविवार २२ नोव्हेंबर २००९]
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा