लगावली : गागाल गालगागा
मात्रा: १२
----------------------------------------------------------------
खड्ड्यात जास्त पडतो उपदेश तोच करतो ..
-
खाऊन लाच कोणी
दानात खास रमतो ..
-
हाती गुलाब ज्याच्या
काट्यास का विसरतो ..
-
गाऊन गोडवे तो
नक्की पुढ्यात हसतो ..
-
ज्याच्या मुखात निंदा
मागेच नित्य फिरतो ..
-
पाहून हासतो जो
परिचीत तोच नसतो ..
-
बघताच ओळखीचा
तोंडास का फिरवतो ..
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा