(चाल- अशी चिक मोत्याची माळ ...)
चला दत्तात्रयाच्या जाऊया दर्शनाला ग
दत्तात्रयाच्या जाऊया दर्शनाला ग
पाहू डोळे भरून त्या त्रैलोक्याच्या स्वामीला ग
डोळे भरून त्या त्रैलोक्याच्या स्वामीला ग ।।
धरी कमंडलू , त्रिशूळ उभा तो हातात ग
छान शंख पहा, हातात चौथ्या चक्रास ग
शोभे डमरू आणिक फूल कमळाचे दत्तास ग ।।
त्या त्रैमूर्तीचे घेऊया दर्शन दुरून ग
चला करूया प्रार्थना दोन्ही हातांना जोडून ग
म्हणू दिगंबरा दिगंबरा चला समोर ग ।।
वेद चारही उभे भवती श्वानांच्या रूपात ग
भूमाता उभी बाजूला गाईच्या रूपात ग
दत्त दत्त गाऊया भजनी रंगून जाऊया ग ।।
.
चला दत्तात्रयाच्या जाऊया दर्शनाला ग
दत्तात्रयाच्या जाऊया दर्शनाला ग
पाहू डोळे भरून त्या त्रैलोक्याच्या स्वामीला ग
डोळे भरून त्या त्रैलोक्याच्या स्वामीला ग ।।
धरी कमंडलू , त्रिशूळ उभा तो हातात ग
छान शंख पहा, हातात चौथ्या चक्रास ग
शोभे डमरू आणिक फूल कमळाचे दत्तास ग ।।
त्या त्रैमूर्तीचे घेऊया दर्शन दुरून ग
चला करूया प्रार्थना दोन्ही हातांना जोडून ग
म्हणू दिगंबरा दिगंबरा चला समोर ग ।।
वेद चारही उभे भवती श्वानांच्या रूपात ग
भूमाता उभी बाजूला गाईच्या रूपात ग
दत्त दत्त गाऊया भजनी रंगून जाऊया ग ।।
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा